*_बहादरपूर येथे भाजपा बूथ रचना समिती गठीत_*
(चामोर्शी, ता. १५ मार्च २०२५ ) बहादरपूर येथील बूथ क्रमांक ३१५ च्या बूथ समितीचे गठीत करण्यात आली. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वाखाली ही बुथ समिती संपन्न झाली.
*नवनियुक्त बूथ समिती पदाधिकारी*
हया बुथ समिती कार्यक्रमात निवडणूक अधिकारी म्हणून माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी बूथ अध्यक्ष तुफान जितेन गाईन व सरचिटणीस म्हणून हराधन बाला यांची निवड करत घोषणा जाहीर केली. जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी संपूर्ण बूथ समिती रचनेची सविस्तर माहिती दिली.
*नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन*
नवनियुक्त बूथ अध्यक्ष व सरचिटणीस यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी भाजपाच्या संघटनात्मक कार्याचे महत्त्व विशद करत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावागावात पोहोचवण्याचे आवाहन केले.
तसेच या प्रसंगी *मा.खा.डाँ.अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्यासह मान्यवरांनी मानले बहादुरपूर या गावचे आभार..*
चामोर्शी तालुक्यातील बहादुरपूर गाव भाजपसाठी मताधिक्याचा बालेकिल्ला ठरला आहे. प्रत्येक निवडणुकीत येथे भाजपला गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान होते. सध्या पक्षाचे बुथसंघटन सुरू असून, गावागावात प्रचार मोहीम राबवली जात आहे. या पाठिंब्यासाठी बहादुरपूर ग्रामस्थांचे आभार मानले!
यावेळी मा.खा. डॉ. अशोकजी नेते, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, तालुका महामंत्री विनोद गौरकर, डॉ. परिमल हलदार, दूलाल मंडल, सुरेश गुंतीवार, बल्लमवार सर,माजी सरपंच तथा भाजप जेष्ठ नेते कांताराम मंडल, जेष्ठ नेते जगन्नाथ हलदार,बुथ प्रमुख तथा जेष्ठ नेते सुरजो मोदी, अंजन मालाकार,सुधिर दास, तसेच बहादरपूर गावातील नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






