पुष्पा स्टाईल ने लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळी अडकली वनविभागाच्या जाळ्यात
एटापल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत हालेवारा उपक्षेत्रातील जिजावंडी हे गाव छत्तीसगड सिमालगत असुन दिनांक 12/03/2025 रोजी रात्रीस C.G.08 AV 3294 क्रमांकाचे 16 चाकी ट्रक लाकडानी भरून छत्तीसगडच्या इरपनार मार्गे दुर्ग येथे जात असल्याचे वनविभागास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे वनविभागाचे अधिकारी यांनी त्वरीत सापळा रचुन ट्रक अडविला. चौकशी अंती अवैध मार्गाने जंगलातुन सेमल प्रजातीचे लाकडे विनापरवाना वाहतुक होत असल्याचे निष्पन्न झाले असता ट्रक वनपरिक्षेत्र कर्यालय, एटापल्ली येथे आण्याचा पर्यंत केला परंतु ट्रक मध्ये बिघाड झाल्याने वाहण हालविता आले नाही. वनाधिकारी यांनी ट्रक दुरुस्तीचा पर्यंत केले असता यश आले नाही. सदरचे घटना स्थळ हे अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात असल्याने वनाधिकारी हे त्या रात्री जवळच असलेल्या पिपली (बुर्गी) येथे मुक्कामी थांबले मात्र त्याच रात्री छत्तिसगड राज्यातुन जवळ-जवळ 50 ते 60 इसम येऊन ट्रक जबरदस्तीने छत्तिसगड राज्यात पळविला असता दिनांक 15/03/2025 रोजी पाहाटे 05.00 वाजेपासुन वनविभागाच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करत छत्तिसगड राज्यातील पखांजुर येथुन ट्रक जप्त करुन पखांजुर पोलीस विभागाच्या मदतीने वनपरिक्षेत्र कार्यालय, एटापल्ली येथे आणण्यात आला. घटनेतील आरोपी मिहीर निमाई विस्वास, अनादी मिस्त्री रा. पखांनजुर, शांती अरविंद दत्ता, बप्पी दत्ता, रा. विकासपल्ली हे फरार असून वरील गुन्हा गावकऱ्यांचा संगनमताने घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचा तपास हा श्री. शैलेश मिना उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग यांचें मार्गदर्शनात श्री. दिपक रामटेके, सहाय्यक वनसंरक्षक भामरागड, निलीमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली क्षेत्र सहाय्यक, श्री. प्रदीप गेडाम, भगवान नागोसे, श्रीनीवास आडे, ओमप्रकाश धात्रक, वनरक्षक श्री, राजेश्वर देशमुख, सचिन तोराम, कवि भांडेकर कैलाश मडावी, सुजाता अडगोपुलवर, यांनी पुर्ण केला असुन फरार आरोपींचा शोध सुरु आहे






