*स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद- जिल्हाध्यक्षा डॉ.सोनल कोवे यांच्या हस्ते दीप्रज्वलन*
जागतिक महिला दिनानिमित्य खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम गडचिरोली येथील स्कूल ऑफ स्कॉलर येथे २१ मार्च ला सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला होता सुप्रसिद्ध अनुभवी निवेदक अमोल शेंडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले यावेळी बहुसंख्य महिलांनी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून मनसोक्त आनंद लुटला.गडचिरोली जिल्ह्यातील असल्या प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असल्याने महिला मोठ्यासंखेने सहभागी होऊन परत अशे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा डॉ.सोनलताई कोवे यांच्या उपस्थितीतीने महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. स्कूल ऑफ स्कॉलर कडून डॉ. सोनल कोवे यांचा जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा डॉ.सोनलताई कोवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य अजय लांडगे, उपप्राचार्य शैलेश आखरे, गोंडवाना विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सविता साद्दमवार, राणी कुंभारे, वृषाली हर्षे, शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






