Home Breaking News *29, 30 व 31 मार्च रोजी कोषागारे सुरू; देयके वेळेत सादर करण्याच्या...

*29, 30 व 31 मार्च रोजी कोषागारे सुरू; देयके वेळेत सादर करण्याच्या सूचना*

92

*29, 30 व 31 मार्च रोजी कोषागारे सुरू; देयके वेळेत सादर करण्याच्या सूचना*

 

गडचिरोली, दि. 29 मार्च 2025: आर्थिक वर्ष 2024-25 समाप्त होण्याच्या पार्श्वभूमीवर, 29, 30 व 31 मार्च 2025 रोजी शासकीय सुटी असूनही जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कोषागार व उपकोषागार कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत. तरी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता देयके वेळेत सादर करण्याच्या सूचना जिल्हा कोषागार अधिकारी लक्ष्मण लिंगालोड यांनी सर्व कार्यालयप्रमुखांना दिल्या आहेत.

 

31 मार्च हा आर्थिक वर्षाचा अंतिम दिवस असल्याने शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेला निधी विहित प्रक्रियेनुसार खर्च केला जावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या तीनही दिवसांमध्ये कोषागार कार्यालये देयक स्वीकृतीसाठी खुली राहणार असून, सर्व वित्तीय व्यवहार वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

ज्या विभागांना मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करण्याची गरज आहे, त्यांनी कोणतीही विलंब न करता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून निधीचे वितरण व ऑनलाईन देयके बिल पोर्टल वर सादर करून इंटरनेट व इतर तांत्रिक अडचणींमुळे होणारी गैरसोय टाळावी असे आवाहनही श्री लिंगालोड यांनी केले आहे.

Don`t copy text!