गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाया विद्याथ्र्यांसाठी “एक दिवसीय कार्यशाळा व पुस्तक वाटप” कार्यक्रम संपन्न
श्व् अतिदुर्गम भागातील 422 विद्याथ्र्यांना करण्यात आले पुस्तकांचे वाटप
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातून, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या अंतर्गत शैक्षणीक प्रगतीसाठी राबविण्यात येणाया उपक्रमांचा एक भाग म्हणुन आज दिनांक 01/04/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील विद्याथ्र्यांसाठी ‘एक दिवसीय कार्यशाळा व पुस्तक वाटप कार्यक्रम’ पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.
सन 2024-25 या शैक्षणीक वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारा स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास केंद्रांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये बी.ए.च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणारे 422 विद्यार्थी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. या सर्व विद्याथ्र्यांना यावेळी मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे हस्ते पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी घेण्यात आलेल्या कार्यशाळेदरम्यान विद्याथ्र्यांना सायबर अपराधांबाबत माहिती देऊन सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी उपयुक्त अशा सुचना देण्यात आल्या. तसेच यावेळी विद्याथ्र्यांना सायबर साक्षर होण्याविषयी शपथ देखील देण्यात आली.
गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागातील शिक्षण सोडलेल्या युवक युवतींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा गडचिरोली पोलीस दलाचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोली जिल्हयामधील दुर्गम भागातील शिक्षणाच्या अपुया सोयी-सुविधा तसेच शिक्षण सोडलेल्या युवक-युवतींसाठी सन 2018 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचेशी समन्वय साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत मुरुमगाव, एटापल्ली, ताडगाव, पेंढरी व जिमलगट्टा या 05 ठिकाणी अभ्यास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली असून या 05 अभ्यास केंद्रांच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत एकूण 2529 विद्याथ्र्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना शिक्षण पुर्ण करुन आजच्या प्रगत युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम रमेश, हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “युवक-युवतींनी मोठे स्वप्ने बघावीत व केवळ आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रीत करावे. गडचिरोली पोलीस दल युवक-युवतींच्या शैक्षणीक प्रगतीसाठी सदैव त्यांच्या पाठीशी आहे.” सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, सायबर पोलीस ठाणे येथील मपोउपनि नेहा हांडे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
।।।।।।।।।।।।