48

*गानली समाज सभागृह येथे र*गानली समाज सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.*क्तदान शिबिराचे आयोजन.*

*भर उन्हाळ्यातही केले 26 रक्तदात्यांनी रक्तदान.*

*गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असतो. रुग्णालयीन सेवा उत्तम असल्यामुळे गडचिरोली लगतच्या जिल्ह्यातील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येथे येत असतात. रक्ताची दैनंदिन निकड लक्षात घेऊन श्री रंजन बल्लमवार व मित्र परिवार यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरविले व दि. 02/04/2025 रोज बुधवारला गानली समाज सभागृह, गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात भर उन्हाळ्यातही 26 रक्तदात्यांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.*

*सदर रक्तदान शिबिराचे अध्यक्षस्थानी श्री प्रकाश खांडेकर, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय गडचिरोली, उद्घाटक म्हणून श्री संजय डोंगरवार, कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय गडचिरोली, मुख्य अतिथी म्हणून श्री सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाशराव तोडेवार, अध्यक्ष गाणली समाज शिक्षण व कल्याण मंडळ गडचिरोली, श्री नितीनराव संगीडवार अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा गानली समाज संघटना तसेच श्री राजेंद्रजी भरडकर, सचिव गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर गडचिरोली हे उपस्थित होते.*

*कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.*

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रविंद्रजी आयतुलवार, सचिव गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ गडचिरोली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रंजन बल्लमवार व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संजय सोनुले यांनी केले.*

*सदर कार्यक्रमाकरिता गानली समाज संघटनेकडून मोफत सभागृह उपलब्ध करून देण्यात आले. त्याबद्दल श्री रंजन बल्लमवार यांनी संघटनेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रविंद्र आयतुलवार , श्री स्नेहल संतोषवार, सौ. ममता कोतपल्लीवार, श्री संजय सोनुले, श्री दिनेश खारकर, श्री अविदास सावसागडे, श्री आतिफ खान, श्री निकेश निकुरे, श्री रोशन गुरुकार, श्री धनराज अहिरकर, श्री रामकृष्णजी ताजने, श्री सचिन कारंजेकर, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी व त्यांचे सहकारी कर्मचारी व रंजन बल्लमवार यांच्या समस्त मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले.*