*आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची नियुक्ती ..*
*विविध आदिवासी संघटना कडून सत्कार*
*समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे प्रतिपादन*
*दि. 5 एप्रिल 2025*
गडचिरोली येथील माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची देशी व्यापी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी गडचिरोली तालुक्यातील विविध संघटनांनी आज दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा महासचिव सदानंद ताराम सर, जंगो राईताड महिला संघटनेच्या अध्यक्ष आरतीताई कोल्हे यांनी सत्कार केला यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सांगितले की मी या विधानसभा क्षेत्राचा दहा वर्षे आमदारकिच्या कार्य काळात समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. आता आमदार नसल्यामुळे माझ्या संसदीय अनुभवाचा फायदा आता समाजासाठी देऊन समाजाला रोजगाराभिमुख व प्रगतशील करण्यासाठी मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा स्वीकार केलेला आहे. भविष्यात सदैव समाजाच्या हितासाठी तयार असून सर्व संघटनांनी बिनधास्तपणे माझ्याकडे येऊन समस्या मांडाव्यात त्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार अशी ग्वाही गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले…..
सदर कार्यक्रमाचे संचालन उमेश उईके यांनी केले, यावेळी जंगो राईताड महिला संघटनेच्या विद्या दुग्गा, तनुजा कुमरे,आरती कंगाले, रोहिणी मसराम, लंकेश मडावी,सुरज मडावी,निलेश आत्राम,रुपेश सलामे, लालसू नागोटी, बादल मडावी, संजय मेश्राम, राजीवशहा मसराम, अक्षय वाढई,अभिजीत बांबोळे,जितेंद्र भुरसे व समाजातील अन्य मान्यवर उपस्थित होते….