जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी केंद्रांतर्गत येत असलेल्या मुरखळा (माल ) येथील जि.प.शाळेत सोमवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर ,सहायक शिक्षक चंद्रकांत वेटे ,राजकुमार कुळसंगे ,जगदीश कळाम यासह शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.तसेच विद्यार्थी यांनी सुद्धा भाषणे दिली.कार्यकमाचे संचालन इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी चैतन्या गटलेवार हिने केले तर उपस्थितांचे आभार इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी त्रिष्टी बुरे हिने मानले.शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






