Home Breaking News डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैरागडात भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातर्फे पाणपोईचे लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैरागडात भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातर्फे पाणपोईचे लोकार्पण

68

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैरागडात भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातर्फे पाणपोईचे लोकार्पण

समाजकार्याची नवी दिशा ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

वैरागड : सामाजिक बांधिलकी जपत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत वैरागडमध्ये एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. भोलूभाऊ सोमनानी यांच्या मित्र परिवारातर्फे इंदिरा गांधी चौक येथे शुद्ध व थंड पाण्याची पाणपोई उभारण्यात आली असून, उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक रंगारी आणि सेवानिवृत्त प्राध्यापक कोसे यांच्या हस्ते पार पडले.

 

कार्यक्रमाला भोलू सोमनानी, शीतल सोमनानी यांच्यासह गावातील विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गावकऱ्यांसाठी उपयुक्त असा हा उपक्रम उन्हाळ्यातील कडाक्यात सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला आहे. उद्घाटनप्रसंगी आयोजकांनी सांगितले की, “या पाणपोईद्वारे गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असून, हा उपक्रम केवळ सेवा नव्हे तर समाजाप्रती असलेली जबाबदारी दर्शवतो.”

 

भोलू सोमनानी यांच्या सामाजिक जाणीवेचे गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केले. सत्कार्य हेच खरे अभिवादन, असे सांगत अनेकांनी त्यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुण पिढीसाठी हा उपक्रम आदर्शवत ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Don`t copy text!