Home Breaking News *केंद्र सरकारच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस...

*केंद्र सरकारच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संपन्न* 

56

*केंद्र सरकारच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संपन्न*

 

 

*काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी हे देशातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला,  युवक व इतर शोषितांच्या  समस्यांना घेऊन लोकसभेत व सार्वजनिक ठिकाणी सतत आवाज उठवित आहेत त्यामुळे या घाबरलेल्या केंद्रातील भाजप शासित मोदी सरकारने राहुलजी गांधी व सोनियाजी गांधी यांच्यावर दबाव तंत्र आणण्याकरिता विविध आरोप लावून सतत नोटिस देत आहे, हे लोकशाही विरोधी कृत्य असून त्याचा निषेध म्हणून मोदी सरकारच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे निषेध आंदोलन करण्यात आला.*

 

या आंदोलनाला  पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरजी अडबले, गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सचिन नाईक, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एड. विश्वजीत मारोतराव कोवासे,  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, महिला जिल्हाध्यक्ष कविता माहोरकर, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,  जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष सहकार सेल अब्दुल पंजवानी, जिल्हध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे,  प्रभाकरजी वासेकर, जितेंद्र मुनघाटे,सुधीर बांबोडे, माजित सय्यद,भैय्याजी मुद्देमवार, नेताजी गावतुरे, चारुदत्त पोहाणे, परशुराम गेडाम, उत्तम ठाकरे, स्वप्निल बेहरे, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, घनश्याम मुरवतकर, काशिनाथ भडके, मिलिंद बारसागडे, आकाश मुलकलवार, राकेश रत्नावार, संजय मेश्राम, विनोद खंडारे, सुरेश भांडेकर, अविनाश श्रीरामवार,गौरव एनप्रेड्डीवार, अरुण भाऊ कुकुडकर, विठ्ठल काळे, जावेद खान, बांगे सर, सौ.अपर्णा खेवले,सौ.कविता उराडे, सौ.सुनीता रायपुरे,  आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी युवक मंडळी उपस्थित होते.

Don`t copy text!