*स्व. डेव्हिड बोगी यांच्या घरी आ.धर्मराव बाबा आत्राम यांची सांत्वनपर भेट!*
कुटुंबियांशी आस्थेने विचारपूस केले
*सदैव पाठीशी असल्याचे ग्वाही दिले*
*अहेरी*,:- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे बालपणापासूनचे सहकारी व कट्टर समर्थक डेव्हिड बोगी यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले होते. शनिवार 26 एप्रिल रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व .डेव्हिड बोगी यांच्या घरी सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबियांशी आस्थेने विचारपूस करून कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे ग्वाही देऊन एक चांगला सोबती सोडून गेल्याचे दुःख व शल्य आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त करून स्व.डेव्हिड बोगी यांना श्रद्धांजली अर्पण केले.
डेव्हिड बोगी यांच्या अर्धांगिनी व चिरंजीव एलव्हिन व नोव्हेल (नानू) यांच्याशी बातचीत करून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी हिम्मत व धैर्य दिले.
भेटीच्या वेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलू भैय्या हकीम, अरुण मुक्कावार, सुरेंद्र अलोणे, आदित्य जकोजवार होते.