*राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयचे प्राचार्य एम के मंडल यांचा सेवा निवृत्ती व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.*
*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांची उपस्थिती.!*
*अहेरी:-* स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम के मंडल यांचा सेवानिवृत्त व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे,माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजे अंब्रीशराव महाराज होते.तर विशेष अतिथी म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष राजमाता राणी रुख्मिणी देवी आणि धर्मराव शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते.
यावेळी कार्यक्रमात दीप प्रज्वलीत व विद्येची देवता माता सरस्वती व थोर समाजसेवक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांनी सत्कारमूर्ती,सेवा निवृत्त प्राचार्य एम के मंडल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.त्यांना शाल,श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी धर्मराव शिक्षण मंडळाचे प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी आणि मंडल कुटूंबातील सदस्य,अहेरीचे प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.!!