Home Breaking News *भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे...

*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे हस्ते उद्घाटन….*

173

*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे हस्ते उद्घाटन….*

गडचिरोली दि. २-५-२०२५

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे दि. २-५-२०२५ रोज शुक्रवारला मा. आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. रस्त्याने जाणारे पांथस्थ भाजीवाले, मजूर वर्ग घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले, की हायसे वाटते. या जाणिवेने ही पाणपोई भाजपा महिला मोर्चा गडचिरोली च्या अध्यक्ष सौ गीता हिंगे यांचे वतीने पोस्ट ऑफिस च्या बाजूला गडचिरोली येथे सुरू करण्यात आली.या उद्घाटन प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशीलजी हिंगे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे , जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे ,शहर अध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ पोहनकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार ,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, प्रतिमा सोनवणे, भूमिका बर्डे, सुनीता आलेवार ,रणछोड कलंत्री ,अविनाश विश्रोजवार, विनोद देवोजवार , नंदेश्वर ,आलमपटलावार , दिपक जाधव तसेच भाजपा कार्यकर्ते व महिला मोर्चाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

Don`t copy text!