*घरगुती रोजच्या भांडणातून मुलाने काढला बापाचा काटा, आरोपीने घेतला आष्टी पोलिसांचा धसका*
*आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्याच्या टीम नि लावला 24 तासात आरोपीचा छडा*
आष्टी प्रतिनिधी
मौजा आष्टी पासून जवळ असलेल्या बामनपेट या गावच्या जंगलामध्ये एका इसमाचा मृतदेह सांगाड्यासहित बामनपेठ येथील पोलीस पाटील यांना माहिती मिळाली त्यानंतर बामणपेट येथील पोलीस पाटील भाऊजी सिडाम याने आष्टी पोलीस स्टेशन येथे येऊन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांना माहिती दिली त्यानंतर आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची टीम सदर घटना स्थळी दाखल झाली मृतदेह सडक्या अवस्थेत असल्यामुळे आष्टी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर व त्यांच्या चमूला सदर घटनास्थळी पाचारण केले . त्यानंतर आष्टी पोलिसांनी सदर मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेतला त्यानंतर आष्टी पोलीस स्टेशन येथे सदर मृतदेह रेवनाथ लक्ष्मण कोळपे वय 55 वर्ष राहणार मार्कंडा देव या गावचा असल्याचे सिद्ध झाले . त्यानंतर आष्टी पोलिसांनी डाग स्कॉटला प्रचारण केले सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांच्या टीमने अहोरात्र 48 तासात संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केला सदर गुन्हेगार रेवनाथ कोडापे यांचा मुलगा आकाश कोडापे असल्याचे सिद्ध झाले . त्यानंतर आकाश यांनी आष्टी पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील यांचा धसका घेऊन पड काढण्याचं प्रयत्न केला, मात्र आपण आपल्याच वडिलांना मारलं या नैराश्यातून सदर मुलगा हा चिचडोह बॅरेज प्रकल्प येतील आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे मात्र आष्टी पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये सदर आरोपीला अटक करून आज गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालय येथे हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस रिमांड मिळाली आहे सदर घटनेमध्ये आरोपीच्या मदतीला लखन देवराव मडावी हा सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये शामिल होता त्यामुळे याला सुद्धा आष्टी पोलिसांनी अटक केली आहे सदर गुन्हा कलम 103,1,140,238,3,5 बी एन एस अंतर्गत आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास अहेरी येथील उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांचे कर्मचारी करीत आहे.