Home Breaking News माकपा चा आरमोरी  तहसील वर ठिय्या आंदोलन

माकपा चा आरमोरी  तहसील वर ठिय्या आंदोलन

153

माकपा चा आरमोरी

तहसील वर ठिय्या आंदोलन

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, निराधार योजनेच्या लाभार्थाचा विविध मागण्यासाठी दि 8 में गुरुवारला तहसिल कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन होते आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यान यावे, आमदार, खासदार सरकार कर्मचाऱ्यांना 58 वर्षांनंतर पेन्शन मिळते मग शेतकरी, शेतमजूर, कामगार, अंगणवाडी सेविका,आशावर्कर, शालेय स्वयंपाकी रोजगार सेवक यांना पण वयाच्या 60 नंतर पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 रद्द करा, तालुक्यातील थकित रोजगार हमीची मजुरी देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट हमीभाव देण्यात यावे, आरमोरी नगरपालिका क्षेत्रात रोजगार हमीचे कामे सुरू करण्यात यावे,आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावे,पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे थकित अनुदान देण्यात यावे,धान बोनस त्वरित जमा करण्यात यावे,अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्यात यावि या सह ईतर मागण्यासाठी माकपाच्या वतीने आरमोरी तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन होनार आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार, राजु सातपुते,अमलदास प्रधान, विठ्ठल प्रधान, गिरीधर बांबोळे, भगवान राऊत,प्रकाश चापले, विनोद राऊत यशवंत नंनावारे यांनी केले आहे.

Don`t copy text!