Home Breaking News *खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते हमी भाव धान खरेदी केंद्राचे उद्घाटन*

*खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते हमी भाव धान खरेदी केंद्राचे उद्घाटन*

60

*खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते हमी भाव धान खरेदी केंद्राचे उद्घाटन*

 

सिरोंचा: दि. 25 मे 2025

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सिरोंचा तालुक्यातील अमरावती गावाला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधन्या बरोबरच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमी भाव आणि विक्रीसाठी अधिक सुलभ व्यवस्था मिळणार आहे. धान खरेदी केंद्रावरील धनाची उचल भरडाई करिता झाली नसल्याने धान खरेदी बंद होती मात्र स्थानिक गरज लक्षात घेता हे केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना लांब प्रवास न करता आपल्या गावाजवळच धान विक्री करता येणार आहे.

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, माजी प. स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शामगोंडा, ग्रामपंचायत सदस्य कार्तिक जंगम, रामचंद्र गोगुला, मोहनराव दरा, सुरज डुडीया, मनोहर अरगेला, ललिता चलावार, गौरव येणप्रेडीवार, विपुल येलटीवार यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

खासदार डॉ. किरसान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. हे धान खरेदी केंद्र हे केवळ एक सुविधा केंद्र नसून, शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल.”

 

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि शेतकरी बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. उद्घाटन सोहळ्यानंतर शेतकऱ्यांनी खासदार डॉ. किरसान यांचे आभार मानत केंद्र सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल आणि त्यांना आपला माल विक्रीसाठी दूर जावे लागणार नाही, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Don`t copy text!