Home Breaking News गणपुर येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष राऊत यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

गणपुर येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष राऊत यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

112

गणपुर येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष राऊत यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

 

गणपुर (ता. चामोर्शी) येथील रहिवासी संतोष गणुजी राऊत यांचा 10 मार्च 2025 रोजी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं असा परिवार आहे. दिनांक 26 मे 2025 रोजी त्यांच्या पत्नीला वन विभागाकडून मिळणारी नियमानुसार आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

 

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. भारतजी खटी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रणयजी खुणे, वन परिक्षेत्र अधिकारी कु. तनुजा मोढळे, श्री. राहुल नैताम व इतर सहकारी उपस्थित होते.

Don`t copy text!