Home Breaking News *आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी अर्ज आमंत्रित*

*आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी अर्ज आमंत्रित*

63

*आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी अर्ज आमंत्रित*

 

गडचिरोली दि २८ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या वतीने सन 2024-25 या चालू आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत उत्पन्ननिर्मितीच्या विविध योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. या योजनांअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना काटेरी तार व जाळीचे तार, पीक संरक्षणासाठी स्प्रे पंप, बॅटरी स्प्रेयर किंवा हँड ऑपरेटर स्प्रेयर, ताडपत्री यासाठी तसेच बेरोजगार लाभार्थ्यांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी, महिलांना टु इन वन शिलाई मशीन खरेदीसाठी आणि शेततळे धारक लाभार्थ्यांना मत्स्यसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी तसेच शेतकरी गटांना थ्रेशर मशिन खरेदीसाठी ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीचा वैध जातप्रमाणपत्र (उपविभागीय अधिकारी यांच्या सहीसह), रहिवासी दाखला, चालू वर्षातील उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्या सहीसह), ग्रामसभा ठराव, आधार कार्ड, आधार लिंक असलेल्या बँक खात्याची स्पष्ट छायांकित प्रत आणि अंपग, विधवा, परित्यक्ता किंवा निराधार महिलांनी त्याबाबतचा अधिकृत दाखला सादर करणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पूर्ण भरून दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत कार्यालयात सादर करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली श्री. रणजित यादव यांनी केले आहे.

Don`t copy text!