Home Breaking News *-विदर्भाची काशी – श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे जलाभिषेक, महापूजा आणि अहिल्याबाई होळकर...

*-विदर्भाची काशी – श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे जलाभिषेक, महापूजा आणि अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध उपक्रमात मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थित_*

94

*-विदर्भाची काशी – श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे जलाभिषेक, महापूजा आणि अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध उपक्रमात मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थित_*

 

चामोर्शी (ता. २९ मे): “विदर्भाची काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे आज एक भव्य व उत्साहपूर्ण धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडला.

माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते श्री मार्कंडेश्वर ऋषींच्या गाभाऱ्यात जलाभिषेक व महापूजा करण्यात आली.

 

या पवित्र निमित्ताने जगन्नाथ बाबा मठ्ठ देवस्थान येथून भक्तिमय वातावरण पारंपरिक भजन ढोलक दिंडी या वाद्यांच्या गजरात भजन दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सहभागी भक्तांनी महामृत्युंजय मंत्राच्या घोषात जलाभिषेक पूजा केली.

 

त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भाजपा व महिला मोर्चा, गडचिरोली यांच्या वतीने मार्कंडा देवस्थान परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

यात विशेष महाजलाभिषेक व अभिषेक पूजा कार्यक्रम,मंदिर व परिसर स्वच्छता अभियान,नदी घाटावर जलपूजन सोहळा, महिला मेळावा व मार्गदर्शन सत्र,महाप्रसाद वाटप या सर्व उपक्रमांना महिला, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला, वातावरण भक्तिभावपूर्ण आणि प्रेरणादायी ठरले.

 

या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:

प्रशांतजी वाघरे – जिल्हाध्यक्ष, डॉ. देवरावजी होळी – माजी आमदार,बाबुरावजी कोहळे – ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,

रेखाताई डोळस – प्रदेश सचिव,

योगिता पिपरे – जिल्हा महामंत्री,गिताताई हिंगे – महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष,अनिल पोहनकर – ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष,डॉ. प्रणयजी खुणे – मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष,रोशनी वरघंटे – तालुकाध्यक्ष,राकेश सरकार तालुकाध्यक्ष, संगीता राजू मोगरे – सरपंच, मार्कंडा,आनंद भाऊ भांडेकर,नरेश अल्सावार,रेवनाथ कुसराम,सोपानभाऊ नैताम, भास्कर बुरे,निरज रामानूजवार, भाविक आभारे,रंजिता कोडापे, पल्लवी बारापात्रे,कविता उरकुडे वर्षा शेडमाके,सदर कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. या निमित्ताने श्री क्षेत्र मार्कंडा पुनः एकदा श्रद्धा, एकता आणि प्रेरणेचं केंद्रबिंदू ठरलं.

Don`t copy text!