Home Breaking News *भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा – गडचिरोली च्या वतीने महिला मेळाव्याचे...

*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा – गडचिरोली च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन*

65

*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा – गडचिरोली च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन*
दि. २९-५-२०२५

चामोर्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील जगन्नाथ बाबा मठ परिसरात दि.29 मे गुरूवारला महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.त्यानिमित्त सकाळी ९ वा. जगन्नाथ बाबा मठ येथून तर मार्कंडेय मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली.त्यांनतर मंदिरात जाऊन शिवाची पूजा,आरती व जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर नदी घाट स्वच्छता अभियान राबवून जलपूजन करून गंगा आरती करण्यात आली. त्यानंतर १२ वाजता जगन्नाथ बाबा मठ येथे व महिलांचा भव्य मेळावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरीत्र, राज्यकारभार, धर्मकार्य या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या आयोजक महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे म्हणाल्या अखंड हिंदुस्थानला आपल्या कर्तृत्वाने प्रकाशित करणारी वीरांगना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.त्यांनी त्यांच्या काळात विधवा पुनर्विवाह, निपुत्रिक म्हणून एखाद्या विधवेची संपत्ती जप्त होऊ न देता तिला दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार मिळवून दिला. हुंडा पद्धत कायदेशीररित्या बंद केली. अशा अनेक कुप्रथा त्यांनी बंद केल्या.
अशाप्रकारे अहिल्यादेवी या एक अद्वितीय धुरंधर राजकारणी सोबत समाजसुधारक देखील होत्या.आणि म्हणून महिलांनी तसेच आजच्या तरुण पिढींनी राजमाता अहिल्यादेवी यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन गीतताई हिंगे यांनी केले.

मेळाव्या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी खा. अशोक नेते, आ. डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे, माजी आमदार देवरावजी होळी ,माजी आ. नामदेव उसेंडी, भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ पोहनकर , किसान आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे ,प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सरपंच संगीताताई मोगरे, सीमा कन्नमवार ,अल्का पोहनकर ,पल्लवी बारापात्रे, भूमिका बरडे,कविता किरमे, प्रतिमा सरकार , प्रतिमा सोनवने, भारती खोब्रागडे , मंदाताई मांडवगडे , भुषणा खेडेकर, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, आनंद भांडेकर, विलास भांडेकर तालुकाध्यक्ष राकेश सरकार, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपच्या सचिव वर्षाताई शेडमाके तर आभार प्रदर्शन चामोर्शी तालुकाध्यक्ष रोशनीताई वरघंटे यांनी केले. मेळाव्याला जवळपास ५५० महिला व १०० पुरुष उपस्थित होते.

Don`t copy text!