Home Breaking News गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

98

 

गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

 

. गडचिरोली पोलीस दल व जिल्हा वैद्यकीय यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले शिबिर

. एकूण 760 पोलीस अधिकारी व अंमलदार यांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी

 

 

गडचिरोली पोलीस दलाकडून आपल्या आस्थापनेवरी अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामध्ये विशेषत: माओवाद विरोधी अभियान, महत्वपुर्ण व्यक्तींच्या भेटीदरम्यान लागणारे बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था तसेच गुन्हे तपास यांसारखे कर्तव्य बजावत असताना पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत असतो. हिच बाब गांभीर्याने विचारात घेऊन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 व 31 मे 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिर पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 30 व 31 मे 2025 रोजी पोलीस मुख्यालय येथील बहुउद्देशीय मंगल कार्यालय स्थित बॅटमिंटन कोर्ट येथे पार पडले. सदर दोन दिवसाच्या संयुक्त वैद्यकीय तपासणी शिबिरात पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, सि-60, सॅग तसेच सर्व शाखा व पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन स्टाफ मिळून एकूण 760 अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व वयोगटातील अधिकारी व अंमलदार यांच्या (1) ब्लड शुगर, (2) लिपिड प्रोफाईल (3) सीबीसी (क्एक्), (4) मूत्रपिंड कार्य तपासणी (ङड्ढदठ्ठथ् क़द्वदड़द्यत्दृद च्र्ड्ढद्मद्य) (5) यकृत कार्य तपासणी (ख्र्त्ध्ड्ढद्ध क़द्वदड़द्यत्दृद च्र्ड्ढद्मद्य) (6) थायरॉईड, (7) रक्तदाब मोजणी, ( एघ् ग्ड्ढठ्ठद्मद्वद्धड्ढथ्र्ड्ढदद्य) (8) क्तडॠ1ड़ अशा विविध आरोग्य तपासण्या घेण्यात आल्या. सदर आरोग्य शिबिराच्या मदतीने गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांना शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होणार आहे.

 

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीचे जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अति. जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. सतिश सोळंकी, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने सदर आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

सदर आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि नरेंद्र पिवाल व अंमलदारांनी अथक परीश्रम घेतले.

Don`t copy text!