Home Breaking News बैलाची शेपटी सोडली व तो पाण्यात बुडू लागला

बैलाची शेपटी सोडली व तो पाण्यात बुडू लागला

172

गडचिरोली : बैल धुण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 6 जून रोजी सकाळी 10:30 वा. च्या सुमारास घडली. कार्तिक ज्ञानेश्वर सोमनकर वय, 15 वर्ष रा. हनुमान वॉर्ड, गडचिरोली असे मृताचे नाव आहे.

 

कार्तिक शिवाजी विद्यालयात शिकत होता. तो गुरूवारी इतर मुलांसोबत बोरमाळा घाटावर बैल धुण्यासाठी गेला होता. तो बैलाची शेपटी धरून पाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे जात होता. बैलाची शेपटी सोडली व तो पाण्यात बुडू लागला. इतरांनाही पोहता येत नसल्याने त्याला कोणीच वाचवू शकले नाही. वार्डात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Don`t copy text!