डॉ. मिलिंद नरोटे यांचे “कर्तव्य कक्ष” जनसामान्यांच्या विकासाचे केंद्रबिंदु ठरावे.
– मा. मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस
दिनांक ०६ जून २०२५ रोज शुक्रवार ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी ६८ गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष – जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या उद्घाटनाप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेशजी बरसागडे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, मा. आमदार कृष्णा गजबे, मा. आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, बाबुरावजी कोहळे, प्रमोदजी पिपरे, रमेशजी भुरसे, रवींद्र ओल्लालवर जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, योगिताताई पिपरे, गीताताई हिंगे, अनिल पोहणकर, अनिल तिडके, योगिताताई भांडेकर, चंदाताई कोडवते, नितीनजी कोडवते, अनिल कुणघाडकर, दत्तू सूत्रपवार, रोशनी वरघंटे, साजन गुंडावर, भास्कर बुरे, दिपक हलदार, राकेश सरकार तसेच भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.
या कर्तव्य कक्ष जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये जनसंपर्क कार्यालयाला विशेष महत्व आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या मध्यमतून आपल्या जिल्ह्यातील, विधानसभा क्षेत्रातील जनसामान्यांचे शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांना योग्य न्याय देण्याचे काम जनसंपर्क कार्यालयातून होत असते. हे जनसंपर्क कार्यालय विधानसभा क्षेत्रातील विशेष करून गडचिरोली जिल्ह्यातील जनसामान्य लोकांच्या कामांच्या माध्यमातून विकासाचे केंद्रबिंदू ठरावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.






