Home Breaking News *शहीद जवानांच्या स्मृतीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन*

*शहीद जवानांच्या स्मृतीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन*

96

*शहीद जवानांच्या स्मृतीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन*

 

*गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण*

 

गडचिरोली, दि. ७ : कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणाऱ्या पोलीस जवानांच्या त्यागाची आठवण ठेवत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी त्यांनी पोलीस दलातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाला सलाम केला आणि पोलीस दलाच्या शौर्य व समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

मुख्यमंत्र्यांसोबत गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी देखील स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

Don`t copy text!