Home Breaking News गोदावरी नदीपात्रात बुडालेल्या ‘त्या’ 6 जणांचे अखेर मृतदेह सापडले

गोदावरी नदीपात्रात बुडालेल्या ‘त्या’ 6 जणांचे अखेर मृतदेह सापडले

78

 

बुडालेल्या ‘त्या’ 6 जणांचे मृतदेह हाती

तेलंगणाच्या हद्दीतील दुर्दैवी घटना

गडचिरोली, . महाराष्ट्र आणि तेलंगणा या 2 राज्यांच्या सीमावर्ती भागातील गोदावरी नदीपात्रात बुडालेल्या ‘त्या’ 6 जणांचे अखेर मृतदेह सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली 6 मुले शनिवारी (दि.7) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बुडाली होती. ही सहाही मुले तेलंगणाची असून, त्यांचा शोध लागला आहे.

महाराष्ट्र व तेलंगणा या 2 राज्यांच्या सीमेवरील मेडीगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या नदीच्या पात्रात अंघोळीसाठी 6 मुले गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. तेलंगणा पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोधकार्य हाती घेतले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. तेलंगणातील वरिष्ठ मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी या घटनेची माहिती घेतली. मात्र शनिवारी यापैकी कुणाचाही थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान, आज रविवारी सर्व सहाही जणांचे मृतदेह हाती लागले. मृतकांमध्ये पत्ती मधुसूदन (15), पत्ती मनोज (13), कर्नाळा सागर (14), तोगरी रक्षित (11) सर्व रा. आंबटपल्ली, जि. जयशंकर भुपालपल्ली, तेलंगणा), पांडू (18) व राहुल (19) दोघेही रा. कोरलाकुंडा, जि. जयशंकर भुपालपल्ली, तेलंगणा यांचा समावेश आहे. या घटनेनंतर मुलांच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली. महाकाय पात्रात बुडालेली ही मुले सुखरूप परत यावीत यासाठी देवाचा धावा करत काळीज पिळवटणारा आक्रोश केला, त्यामुळे परिसर सुन्न झाला होता. मात्र, सर्वांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांनी प्रचंड आक्रोश केला

Don`t copy text!