Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली येथील युवक-युवती मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि...

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली येथील युवक-युवती मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप करीता पुणे येथे रवाना

115

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली येथील युवक-युवती मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप करीता पुणे येथे रवाना

 

* क्विज विनिंग टुगेदर कंपनी व टाटा मोटर्स कंपनी पुणे यांच्या सहकार्याने 29 युवक-युवती घेणार उपक्रमाचा लाभ

 

गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील सुशिक्षित युवक-युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल, क्विज विनिंग टुगेदर कंपनी व टाटा मोटर्स कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कमवा व शिका’ या योजनेंतर्गत मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप करीता आज दिनांक 10/06/2025 रोजी 29 युवक-युवतींना प्रशिक्षणकामी टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे रवाना करण्यात आले. सदर कंपनीमध्ये युवक-युवतींना मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिपचे एकुण 03 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सदर कालावधीत युवक-युवतींना स्टायफंड देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या युवक-युवतींना टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे नोकरी देखील मिळवून देण्यात येणार आहे. सदर उपक्रमामूळे गडचिरोली जिल्ह्रातील गरजू सुशिक्षित आदिवासी तरुण तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण मिळण्यास मदत होऊन याद्वारे उपलब्ध होणा­या रोजगारामुळे त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होणार आहे.

आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत 8103 युवक-युवतींना रोजगार व 5614 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथिल स्किलींग इन्स्टिट¬ुटच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण 120 वेब डेव्हलपर व 120 सॉफ्टवेअर डेवलपर व 1564 युवक-युवतींना ड्रायÏव्हग, 208 कराटे, 300 एस.पी.सी. व 1700 युवक-युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण असे एकुण 3912 युवक-युवतींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

 

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Don`t copy text!