गडचिरोली: आष्टीच्या तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मृतक मुलीची आई व तिच्या भावी पतीस जबरदस्त धक्का पोहचला
आष्टी येथील एका तरुणीने कोनसरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० जून ला सकाळी १० वाजताच्च्त्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अंजली राजू खडसे (२२) रा. आष्टी असे आहे.
सदर मुलीची आई कोनसरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवीका आहेत. त्या आपल्या स्वगृही आष्टी येथे दोन मुली सह राहत असताना सकाळी अंजली घरातून केव्हा निघून गेली हे त्यांना कळले नाही. सदर मुलीचे लग्न मुल येथील अनुराग कन्नाके यांच्यासोबत जुळले होते अंजलीचा १० जूनला पेपर असल्याने तिला शाळेत पोहचविण्यासाठी अनुराग आष्टी येथे आला. तेव्हा तिने आत्महत्या केली असे कळले आष्टी पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह विहिरीबाहेर काढला. प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आष्टी येथे पाठविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे मृतक मुलीची आई व तिच्या भावी पतीस जबरदस्त धक्का पोहचला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उपनीरिक्षक भाग्यश्री जगताप व पोलीस करीत आहेत.
भास्कर फरकडे प्रतिनिधी एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली






