Home Breaking News *जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सुनील बोमनवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सुनील बोमनवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

154

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सुनील बोमनवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

सावली:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक १०जुलैला होणार असून या निवडणुकीकरिता अर्ज भरण्याचा दिवस बुधवार शेवटच्या होता. या शेवटच्या दिवशी सावली तालुक्यातुन ब-१प्रक्रिया गटातून सुनील तुकाराम बोमनवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.ते कांग्रेसचे आ.विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असल्याची सावली तालुक्यात ओळख आहे.परंतु वेळेवर कोणत्या राजकीय पॉनल मधून ही निवडणूक लढविणार हे आताच सांगणे उचित होणार नाही.परंतु ही येणारी वेळ सांगेल हे मात्र खरे आहे

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दिगग्ज उमेदवार रिंगणात उभे आहेत. असे असताना ब-१ गटातून सावली तालुक्यातुन सुनील तुकाराम बोमनवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने बँकेच्या निवडणुकीत जोरदार रंगत आणली आहे.सुनील बोमनवार यांनी दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्हचे विद्यमान संचालक आहेत. तसेच व्याहाड बूज ग्रामपंचायत कार्यालयाचे ते माजी उपसरपंच व विद्यमान सदस्यआहेत.ओबीसी कांग्रेस सेलचे अध्यक्ष असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सावलीत प्रथम आगमना प्रसंगी मोठा कार्यक्रम सोहळा घेतला होता. आणि जोरदार स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेतला होता.त्यामुळे प्रतिभा धानोरकर खासदार यांचे जवळचे निकटवर्तीय आहेत अशीही ओळख निर्माण केली आहे. ते सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिले असून नुकतेच ते कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडणूक आले असून आता विद्यमान संचालक आहेत. मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष आहेत. नुकताच त्यांना दैनिक नवभारत-नवरास्ट्र गृपतर्फे जिल्हा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येऊन माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते गौरवविण्यात आले आहे. सुनील बोमनवाराच्या रूपाने परिवाराला एक राजकीय वारसा मिळाला आहे.चांगली राजकीय कारकीर्द प्राप्त झाली असून शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता राखण्यासाठी परिवारातील सदस्यांचा वाटा फार मोठा आहे.त्यांचे लहान भाऊ डॉक्टर नितीन बोमनवार नागपुरात मोठे कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. रुग्णासाठी सेवा२४तास देतात. याचा तालुक्यातील रुग्णांना फायदा मिळतो.सुनील बोमानवर यांची सहकार क्षेत्रात चांगली पकड आहे.

स्वर्गीय गणपत पाटील बोमनवार बहुउद्देशीय सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणीक विविध उपक्रम राबविण्यात येतात.आरोग्य तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक,असे प्रेरणादायी ,प्रशंसनीय उपक्रम घेतले जातात.त्यामुळेच नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात.अशी तालुक्यात ओळख निर्माण झाल्याने राजकीय मोठे नेते मंडळींचे याना राजकीय दृष्टीने अतिशय योगदान लाभले आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार,राईस मिलचे मालक प्रशांत चिटनूरवार, अनंता चिटनूरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरुमवार, हिवराज शेरकी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,नितीन गोहणे,खुशाल लोडे अध्यक्ष सेवा सहकारी संस्था,आदींनी प्रोत्साहन दिले आहे.

Don`t copy text!