पं.स.च्या लिपिकाने घेतला गळफास
गडचिरोली : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आस्थापना विभागात कार्यरत लिपिकाने ताणतणाव व नैराश्याच्या कारणावरून येथे रामनगर भागात भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ जून रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. अशोक चंद्रशहा हलामी (५२, रा. धानोरा हमु. रामनगर, गडचिरोली) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना मूलबाळ नव्हते. पती-पत्नी दोघेच वास्तव्य करीत होते. गडचिरोली पोलिसांनी त्यांचा मृतदेह फासावरून उतरवला व जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मूल होत नसल्याने ते तणावात असत. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.






