Home Breaking News आजची आरोग्य टिप्स🌺दिनांक-15/06/2025 रविवार

आजची आरोग्य टिप्स🌺दिनांक-15/06/2025 रविवार

151

🌺आजची आरोग्य टिप्स🌺दिनांक-15/06/2025 रविवार

*दररोज सकाळी अंकुरलेले मूग खावे*

अंकुरित मुगात प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगात फायबर्स, व्हिटॅमिन बी-6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इत्यादी घटक असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे सर्व आपल्याला रोगाविरुध्द लढण्याची शक्ती देतात. तसेच यामुळे शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.

◆अंकुरित मुगात ग्लूकोजची पातळी कमी असते, म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते सुध्दा अंकुरित मुग खाऊ शकतात.

◆सकाळी थोड्याश्या अंकुरित मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते.

◆अंकुरित मुगाचे सेवन केल्याने चयापचय दर चांगला राहतो आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते.

◆बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास अंकुरित मुग खावे, त्यात भरपूर फायबर आहे. जे पोटाच्या प्रत्येक समस्येपासून संरक्षण करते. तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

◆अंकुरित मुगात लोहाचे चांगले प्रमाण असते. याच्या सेवनाने हिमग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत मिळते.

◆मोड आलेल्या मुगात अँटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने संधिवातात (अर्थारायटिस) उपयुक्त ठरतात. शरीरात व्हिटॅमिन आणि प्रथिनेची कमतरता असल्यास त्याची कमतरता दूर करण्यासाठी अंकुरित मूग खावे.

◆अपचनाचा त्रास होत असेल तर सकाळच्या नाश्त्यात एक वाटी अंकुरलेल्या मुगाचा समावेश करावा. मुगात असलेल्या फायबर मुळे पचन शक्ती सुधारण्यास मदत मिळते.

◆अंकुरलेल्या मूगात भरपूर एंजाइम असतात, जे पचन सुलभ करण्यास मदत करतात. हे सेवन केल्याने बद्धकोष्ठता येत नाही. तसेच, पोटाशी संबंधित सर्व रोग गायब होतात.

◆अंकुरित मुगात व्हिटामिन-ए असते. याच्या सेवनाने नजर तीक्ष्ण होते. यात असलेले गुणधर्म मुरुम काढून टाकण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

◆वजन कमी करण्यासाठी अंकुरलेल्या मूगाचे सेवन सुरू करावे, लवकरच फरक दिसेल. त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते.

🌱संकलन🌱🙏🏻रजनी रामगिरवार🙏🏻
☘️आरोग्यनिशी समुह☘️
8️⃣3️⃣0️⃣8️⃣0️⃣1️⃣3️⃣5️⃣2️⃣1️⃣

Don`t copy text!