Home Breaking News जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १२ वीच्या बाहेर...

जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १२ वीच्या बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकली पुरविण्यात याव्यात,

77

Chamorshi—मानव विकास मिशन योजने अंतर्गत सध्या केवळ विद्यार्थिनींना सायकली वाटप केल्या जातात तसेच मोफत बस पास सुविधा उपलब्ध आहे. मात्र, इयत्ता ८ वी ते १२ वीमध्ये शिकत असलेले, ग्रामीण व आदिवासी भागातील बाहेर गावावरून ये-जा करणारे विद्यार्थी या सुविधांपासून वंचित आहेत.

यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक विद्यार्थी वयाच्या मर्यादेपूर्वी दुचाकी वाहन चालवतात. त्यामुळे रस्ते अपघात वाढत आहेत आणि पर्यावरणाचे प्रदूषणही होत आहे. शिक्षणात सातत्य टिकवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आज आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सायकल अनिवार्य करण्यात आले आहेत, यावरूनच सायकलीचा शैक्षणिक वातावरणात किती महत्त्वाचा उपयोग होतो हे स्पष्ट होते. या बाबत संदर्भ पत्र क्रमांक १ व २ द्वारे संघटनेने आपणास निवेदन दिलेले आहे.कृपया या विषयी विचार करावातरी,आपल्यागडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास साधण्यासाठी, तसेच त्यांना शाळेत नियमितपणे उपस्थित राहता यावे म्हणून, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १२ वीच्या बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकली पुरविण्यात याव्यात, अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली तर्फे आपणास पुनश्च आग्रहाची नम्र विनंती आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग वाढेल. अपघाताचे प्रमाण कमी होईल.

पर्यावरणपूरक वाहतूक साधनाचा प्रसार होईल.सामाजिकदृष्ट्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व स्वावलंबन वाढेल.त्यामुळे, सदर मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक त्या कार्यवाहीस मान्यता द्यावी, अशी जिल्हा कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष नागपूर विभाग संतोष सुरावार यानी मागणी केली आहे.

Don`t copy text!