Home Breaking News *_राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा सहपालकमंत्री मा.ना.श्री. अँड. आशिषजी जयस्वाल यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांची...

*_राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा सहपालकमंत्री मा.ना.श्री. अँड. आशिषजी जयस्वाल यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक: स्थानिक समस्या व कार्यपद्धतीवर मंथन!_…*

77

*_राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा सहपालकमंत्री मा.ना.श्री. अँड. आशिषजी जयस्वाल यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक: स्थानिक समस्या व कार्यपद्धतीवर मंथन!_…*

 

दि.२३ जून २०२५ गडचिरोली |

राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा.ना. अ‍ॅड. आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक आज गडचिरोलीतील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड ,गडचिरोली येथे पार पडली.

 

या बैठकीच्या निमित्ताने माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी मान. आशिषजी जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.

 

या महत्वपुर्ण बैठकीस प्रामुख्याने आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजभे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉ. नितीन कोडवते व डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय चाटे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर, स्थानिक अडचणींवर आणि कार्यपद्धतीच्या अनुषंगाने साधक-बाधक चर्चा झाली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडत समस्या मांडल्या, तसेच त्या समस्यांच्या निराकरणासाठी मा. जयस्वाल साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजनांची हमी दिली.

 

ही बैठक परस्पर सुसंवाद, संघटनबांधणी व कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

Don`t copy text!