*हेलिकॉप्टर घ्या… पण गाव/ तालुक्यात या, साहेब!*
*गडचिरोली जिल्हा काँग्रेसचा 26 जूनला अनोखा आंदोलन ; प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना कांग्रेस करनार हेलीकॉप्टर वाटप*
गडचिरोली ::
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी मागील तीन वर्षापासून स्वतःकडे घेतली असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होणे ऐवजी अधिक वाढत चालल्या आहेत.
वादळ वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची नुकसान होऊन अजून पर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही, रानटी हत्तींचा उपद्रव आहे त्यांचा अजून बंदोबस्त करण्यात आलेला नाही, सुरजागड खदानीतील अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात, रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे मान्सून पूर्व जिल्ह्यातील रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत, शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने मोठा गाजावाजा करून शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत तर केले मात्र त्याच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता चांगल्या सुरक्षित बसेस नाहीत अनेक बसांची दैनिय अवस्था झाली आहे, शेतकरी नागरिकांना छोट्या मोठ्या समस्यांना घेऊन प्रशासकीय कार्यालयात वारंवार चक्रा मारावे लागतात मात्र त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही, अनेक कंत्राटदारांचे शासकीय कामांचे देयके थकीत आहेत, नवीन कामाचे नियोजन झाले नाही, पावसाळा सुरू झाला असून अजूनही बऱ्याच घरकुलधारकांना रेती मिळाली नाही, त्यांची देयके थकीत आहेत, मनरेगाचे पैसे अजून प्रलंबित आहेत, ग्रामीण भागातील विद्युत वारंवार खंडित होत आहे संबित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष राहत नाही, जिल्ह्यातील बेरोजगार तरुण अजूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांशी कुठल्या प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत करण्याचा धोरण शासनाने अवलंबिला आहे, तालुक्यातील अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नाही, त्यामुळे नागरिकांना वारंवार संबंधित कार्यालयात जावे लागते, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्यक्ष येऊन जनतेची दुःखं समजून घ्यावी, अशी अपेक्षा जनतेची आहे, पण प्रत्यक्षात कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने गडचिरोलीत येणे, आणि लगेचच नागपूरला परत जाणे, हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची दिसत आहे, इतकेच नाही तर जिल्ह्यातील प्रमुख पदावर बसलेल्या प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांची देखील हिच परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, नागरिकांनी भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्यास साहेब वी सी मध्ये किंवा बैठकित व्यस्त आहे असे सांगून संबंधित नागरिकास परत पाठविले जाते, व फक्त वातानुकूलित खोलीत बसून जिल्ह्यातील शेतकरी महिला बेरोजगार तरुण यांच्या करीता निर्णय घेतले जातात प्रत्यक्षात मात्र त्यांच्या समस्या कोणीही ऐकून घेत नाही.
त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासह प्रमुख पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गाव किंवा किमान तालुकास्तरावर तरी यावे या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 26 जून 2025 रोजी, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे दुपारी 2 वाजता, *”हेलिकॉप्टर घ्या; पण गाव/ तालुक्यात या, साहेब!”* या घोषणेने एक अनोखे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, महिला, तरुण, बेरोजगार व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.






