Home Breaking News अंमली पदार्थाची तस्करी तसेच सेवन करणा­या विविध गुन्ह्रातील आरोपींवर गडचिरोली पोलीसांकडून कारवाई

अंमली पदार्थाची तस्करी तसेच सेवन करणा­या विविध गुन्ह्रातील आरोपींवर गडचिरोली पोलीसांकडून कारवाई

74

अंमली पदार्थाची तस्करी तसेच सेवन करणा­या विविध गुन्ह्रातील आरोपींवर गडचिरोली पोलीसांकडून कारवाई

* सन 2025 मध्ये पोस्टे गडचिरोली येथील तपास पथकाकडून आतापर्यंत एकूण 2,00,000/- रुपयांचा अंमली पदार्थ करण्यात आला हस्तगत

गडचिरोली जिल्ह्रात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. यासोबतच आज दि. 26/06/2025 रोजी जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली शहरातील व ग्रामीण भागात अवैधपणे अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे यांचे विरोधात विशेष मोहिम सुरु करून प्रभावी कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी विशेष सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मागील आठवड¬ामध्ये पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे एनडीपीएस कायदा-1985 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्रंातील आरोपींचा शोध घेणे, अवैधपणे विक्री करणारे, गांजाचा पुरवठा करणारे इसम यांचे शोध घेणे याबाबत पोलीस स्टेशन, गडचिरोलीचे अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, दि. 17/04/2025 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीतील इंदिरानगर चेक पोस्टजवळ अज्ञात दूचाकीस्वार अंमली पदार्थ घेवून जात असताना सदर दूचाकीस्वार आपले वाहन घसरुन वाहनावरुन पडला होता. त्यावेळी पोलीस पथकाला घटनास्थळावर रू. 9500/- किंमतीचा 472 ग्राम अंमली पदार्थ मूद्देमाल मिळून आला होता. यातील अज्ञात आरोपीचा गोपनीय बातमीदारांच्या व सिसिटीव्ही फूटेजच्या मदतीने शोध घेण्यात आला असता, सदर अज्ञात इसम हा 17 वर्षीय अल्पवयीन बालक असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपासादरम्यान सदर अल्पवयीन बालकाकडे सदरच्या अंमली पदार्थाबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा इसम नामे वनमाळी लहानु जंंेगठे, वय 46 वर्षे, रा. कोसरी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे असल्याचे सांगितले. यावरुन पोलीस पथकाने पंचंासमक्ष वनमाळी लहानु जेंगठे याच्या घराची झडती घेतली असता, घरझडती मध्ये 01 किलो 04 ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून, एकूण 1476 ग्राम रू. 34,500/- रुपये किंमतीचा गांजा/अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. यावरुन आरोपी वनमाळी लहानु जंंेगठे, वय- 46 रा. कोसरी ता. आरमोरी जि. गडचिरोली यास दिनांक 23/06/2025 रोजी गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे.

 

तसेच पोस्टे गडचिरोली येथे दि. 19/05/2025 रोजी एनडीपीएस कायदा कलम 8 सी 20 ब अन्वये अप क्रमांक 316/2025 गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्रातील संशयीत आरोपी हा फरार होता. मात्र पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी आपल्या तपास कौशल्याचा वापर करुन संशयीत आरोपी नामे बालाजी अंबादास रामटेके रा. साखरा ता. व जि. गडचिरोली यास दिनांक 23/06/2025 रोजी अटक केली आहे.

यासोबतच पोलीस स्टेशन गडचिरोली येथे सन 2025 मध्ये गांजा अवैधपणे विक्री करणा­या आरोपींविरुद्ध एकूण 05 गुन्हे दाखल केले असून यामध्ये 07 आरोपींवर कारवाई करून, एकूण दोन लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. तसेच अंमली पदार्थ सेवन करणा­या दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, सपोनि. शरद मेश्राम, पोउनि. चैतन्य काटकर, माधुरी मिसाळ, अश्विनी पाटील, दिपक चव्हाण, दिपक मोहिते, पोअं./धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, नरेश मेश्राम, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्राागडे, राजेंद्र पुरी, ताजूद्दीन गोवर्धन, अतुल भैसारे, मनोज कन्नाके, फोटोग्राफर पिदूरकर, संतोष नादरगे यांनी पार पाडली.

Don`t copy text!