Home Breaking News *आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या; तात्काळ निराकरण व पाठपुरावा*

*आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या; तात्काळ निराकरण व पाठपुरावा*

79

*आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या; तात्काळ निराकरण व पाठपुरावा*

 

चामोर्शी, २६ जून २०२५

 

स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज चामोर्शी येथील कर्तव्य कक्ष २ मध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडले. आमदार डॉ. नरोटे यांनी प्रत्येक समस्येचे गांभीर्याने ऐकून घेतले आणि त्यापैकी अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश दिले. ज्या समस्यांना अधिक वेळ किंवा प्रशासकीय कार्यवाहीची आवश्यकता होती, त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित समन्वय साधून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

या महत्त्वपूर्ण प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रमेशजी बारसागडे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रितेशजी पालारपवार, भाजपा तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघण्टे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री. भास्करजी बुरे, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री. रेवनाथजी कुसराम, भाजयुमो जिल्हा महामंत्री श्री. मधुकरजी भांडेकर, श्री. नरेशजी अलसावार, श्री. नीरज रामानुजनवर, आणि इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!