*जिल्हाधिकारी मा. अविष्यांत पांडा यांच्या हस्ते आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांचा सत्कार*
गडचिरोली दि. २६-६-२०२५
१० जून २०२५ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या सामाजिक कार्याची राज्य स्तरावर दखल घेऊन त्यांना मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल सामाजिक न्याय दिन व राजश्री शाहू महाराज जयंती चे औचित्य साधून समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकारी मा. अविष्यांत पांडा यांच्या हस्ते गीताताई हिंगे यांचा भारताच्या संविधानची उद्देशिका भेट देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुहास गाडे, समाज कल्याण अधिकारी मा. डॉ सचिन मडावी, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, डॉ. आशिष खोब्रागडे उपस्थित होते.






