Home Breaking News *_”राष्ट्र, देश प्रिय व्हावा, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी” — मा. ना....

*_”राष्ट्र, देश प्रिय व्हावा, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी” — मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रोफेशनल मिट या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन…_*            

73

*_”राष्ट्र, देश प्रिय व्हावा, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी” — मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रोफेशनल मिट या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन…_*

. *_मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती…_* _________________________ *विकसित भारताचा अमृतकाल – सेवा, सुशासन, गरिब कल्याणाचे ११ वर्षे: ब्रम्हपुरीत ‘प्रोफेशनल मिट’ कार्यक्रम संपन्न_*

दि. २९ जून २०२५

देशाच्या सर्वांगीण विकासाला समर्पित सेवा, सुशासन,गरीब कल्याण के अकरा वर्ष ‘विकसित भारत @ 2047 – प्रोफेशनल मिट’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन ब्रम्हपुरी येथील पटेल नगर लोढिया सभागृहात करण्यात आले.

या कार्यक्रमात “मै रहूं ना रहूं, भारत रहना चाहिए…मै देश नहीं झुकने दूंगा…देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतील विचार ”या शब्दांतून व्यक्त होणारी भावना म्हणजेच भारताच्या विकासाचा खरा केंद्रबिंदू आहे, असे मत महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

 

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व: एक लोकशाहीचा आदर्श* मान.नाम. सुधीरभाऊ म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांत कोणतेही भेद न करता संपूर्ण भारतातील जनतेसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषित घटकांसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. देशासाठी समर्पण, राष्ट्रप्रेम, सेवा आणि सुशासन हेच त्यांच्या कार्याचे मूळ सूत्र आहे. आजचा भारत ‘समस्या-मुक्त भारत’, ‘गौरवशाली भारत’, ‘सशक्त भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने सक्षमपणे वाटचाल करतो आहे.”

*”प्रोफेशनल मीट” चे उद्दिष्ट: समाजाशी संवाद*

“या कार्यक्रमाचे आयोजन केवळ सोहळा म्हणून नव्हे, तर समाजातील विविध व्यवसायांशी जोडलेल्या व्यक्तींशी — व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, महिला प्रतिनिधी — थेट संवाद साधण्यासाठी करण्यात आले आहे. आपल्या देशाचा विकास केवळ सरकार पुरेसा नाही, तर प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आणि सहभाग आवश्यक आहे. म्हणूनच हा ‘प्रोफेशनल मीट’ कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे.”

*महिलांच्या सन्मानासाठी क्रांतिकारी निर्णय*

“पूर्वी ग्रामीण भागात, विशेषतः महिलांसाठी शौचालयाची सुद्धा व्यवस्था नव्हती. गावात एखादी गाडी गेली की, महिलांनी रस्त्यावर बसावं लागे. गाडी गेली की परत उठावं लागे. रस्त्यावर निखाऱ्यांसारखी दृश्ये दिसायची. ही अवस्था असह्य होती. पण मोदी सरकारने ही स्थिती बदलवीत प्रत्येक घराघरात शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देत महिलांना प्रतिष्ठा व स्वाभिमान दिला. ही केवळ योजना नव्हती, तर एका युगप्रवर्तनाची सुरुवात होती.”

*लाल दिव्याऐवजी ‘लाल रक्ताच्या माणसावर प्रेम’*

“कधीकाळी लाल दिव्यांची संस्कृती ही सत्तेचे प्रदर्शन होती. प्रत्येक मंत्र्याच्या गाडीवर लाल दिवा लावला जात असे. पण नरेंद्र मोदी यांनी तो लाल दिवा हटवला आणि सांगितले – ‘लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करा!’ ही विचारसरणीच लोकशाहीला बळकट करणारी आहे.”

*राष्ट्रप्रेमातूनच समृद्ध भारत*

“राष्ट्र, देश, ही भावना आपल्या अंतःकरणात रुजली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने ‘माझा भारत महान होण्यासाठी मी काय करू शकतो?’ असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कारण केवळ सरकार नव्हे, तर प्रत्येकाची भूमिका या राष्ट्राच्या उभारणीत मोलाची आहे. देश उभा करायचा असेल तर लोकांनी देशप्रिय व्हावं लागेल. हीच खरी ‘विकसित भारत @2047’ ची वाट आहे.”

भारत माता की जय | जय हिंद | वंदे मातरम् असे मत मा.सुधिरभाऊनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

 

*”३७० कलम रद्द, तीन तलाक बंदी, राम मंदिराचा तोडगा – मोदींच्या नेतृत्वातील ऐतिहासिक निर्णय” – मा.खा.डॉ. अशोकजी नेते*

 

प्रोफेशनल मिटमध्ये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या कार्यानुभवातून मनोगत व्यक्त करताना सांगितले, “३७० कलम रद्द करणे, तीन तलाकचा बंदोबस्त, राम मंदिराचा निर्णायक तोडगा, शेवटच्या घटकापर्यंत योजनांची प्रभावी अंमलबजावणी – हे सर्व ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सरकारच्या अकरा वर्षांत साकार झाले. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या तुलनेत मोदींनी अकरा वर्षांत विकासाचे अभूतपूर्व पर्व घडवले आहे.”असे मत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.

 

या विशेष कार्यक्रमास माजी मंत्री मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशभैय्या शर्मा, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, ओबीसी आघाडीचे प्रदेश सदस्य प्रा. प्रकाशजी बगमारे, विधानसभा प्रमुख प्रा. कादर शेख सर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे, राम लखिया, तालुका अध्यक्ष प्रा. अरुणजी शेंडे (ब्रम्हपुरी), श्रीराम डोंगरवार (शिंदेवाही), शहराध्यक्ष अरविंदजी नंदुरकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर, जिल्हा सचिव साकेत भानारकर, युवा मोर्चा महामंत्री मनोजभाऊ भूपाल तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रोफेशनल मीट या माध्यमातून वकिल, डॉकटर, प्राध्यापक, व्यापारी, महिला प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधण्यात आला.

कार्यक्रमाची सुरूवात “महाराष्ट्र गीत” गात झाली आणि सांगता “राष्ट्रगीत” व भारत माता की जय “या घोषणांनी झाली.

या संमेलनामुळे केंद्र शासनाच्या यशस्वी कार्य काळातील योजनांचा व उपक्रमांचा प्रचार-प्रसार ब्रम्हपुरीतील बुद्धिजीवी वर्गापर्यंत पोहोचला यांचे कौतुक असून यशस्वीपणे कार्यक्रम पार पडला.

Don`t copy text!