Home Breaking News *माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपचारासाठी सिडाम परिवाराला आर्थिक मदत…!*

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपचारासाठी सिडाम परिवाराला आर्थिक मदत…!*

113

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपचारासाठी सिडाम परिवाराला आर्थिक मदत…!*

 

अहेरी : तालुक्यातील मोसम येथील सतीश रामा सिडाम यांना काही दिवसांपासून किडनीचा आजार असल्याने,सिडाम यांच्या घरचा परिस्थिती अत्यंत गरीब असून त्यांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.

 

आज त्यांची पत्नी माया सिडाम व मुलगा प्रवीण सिडाम यांनी काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवारांची भेट घेऊन त्यांची अवस्था सांगितले होते.

 

सिडाम कुटबाची आर्थिक परिस्थिती सांगितल्यानंतर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता सिडाम परिवाराला चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात जाऊन औषध व उपचाराकरीता आर्थिक मदत केली.यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून सिडाम कुटुंबियांना मोठा धीर दिला.

 

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,जगन्नाथ मडावी,श्रीनू राऊत, अशोक सिडाम,गजानन मडावी,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!