Home Breaking News गडचिरोली महावितरण मंडळ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन

गडचिरोली महावितरण मंडळ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन

76

दिनांक ०९ जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणीक संप महाराष्ट्रभर करण्यात येत आहे त्या अनुषंगाने गडचिरोली महावितरण मंडळ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते

केंद्र व राज्य शासनाच्या खाजगीकरण धोरणाच्या विरोधात, समांतर वीज परवाना, प्रीपेड स्मार्ट मीटर, 329 सबस्टेशन खाजगीकरण कंत्राटीकरनाच्या माध्यमाने महावितरण व महापारेषण कंपनीचे अस्तित्व धोक्यात आणण्याच्या षडयंत्राविरुद्ध, महावितरण,महानिर्मिती व पारेषण कंपनीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाच्या विरोधात, उत्तरप्रदेश राज्यात बेकायदेशीररित्या करण्यात येत असलेले खाजगीकरण ,महावितरण कर्मचारी एक दिवसाचा संप करत असून यामध्ये गडचिरोली मंडळातील सात संघटनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झालेले होते.त्या अनुषंगाने द्वारसभेचे व निषेध सभेचे गडचिरोली मंडळ कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते सदर द्वारसभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे श्री रंजन बल्लमवार, प्रविभागीय अध्यक्ष ,श्री संजयजी सोनुले प्रविभागीय सचिव , श्री कुणाल बागुलकर सर्कल सहसचिव सबऑर्डिनेट इंजिनिअर संघटना, श्री निलेश राऊत विभागीय अध्यक्ष, सबऑर्डिनेट इंजिनिअर संघटना, श्री.लव गौरकर सर्कल सचिव सबऑर्डिनेट इंजिनिअर संघटना,श्री.चंद्रकांत शेडमेक राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, श्री जयपालजी मेश्राम झोनल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, श्री सुधीरजी चौधरी मंडळ सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना,श्री. धनराज नन्नावरे विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना ,श्री. कृष्णा आदे विभागीय अध्यक्ष वर्कर्स फेडरेशन संघटना ब्रम्हपुरी,यांनी द्वार सभेला संबोधित केले. द्वारसभेच्या वेळी कर्मचाऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

यानंतरही जर शासनाने वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा केली नाही व आपल्या धोरणात बदल केले नाही तर महावितरण,महानिर्मिती व महापारेषण कंपन्यातील कर्मचारी बेमुदत आंदोलनाचा हत्यार उपासनार आहेत असे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी यांनी मत व्यक्त केले.

Don`t copy text!