*माजी कॅबिनेट मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची वचनपूर्ती*
*भामरागड व आलदांडी (एटापल्ली) परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्याने समाधान:- तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम*
तरुण पिढीच्या हाताला काम मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा स्वप्न क्षेत्राचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पाहिले होते. आणि ते स्वप्न आता पूर्ण होतं असल्याची चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. एलटी गोंडवाना कंपनीच्या माध्यमातून भामरागड व आलदांडी परिसरातील युवक युवतींना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या परिसरातिल युवक युतींना स्थानिक भागातच रोजगाराची संधी मिळत असल्याने आपल्याला समाधान असल्याचे प्रतिपादन तनुश्री ताई धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे. सिनेट सदस्या तसेच एलटी गोंडवाना कंपनीच्या डायरेक्टर,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी युवक युवतींना नोकरीचे नियुक्ती पत्राचे आज 10 जुलै रोजी 12 च्या सुमारास वाटप केले. यावेळी विनोद सर, अरविंद राऊत सर, एलटी गोंडवाना कंपनीचे पदाधिकारी व परिसरातील शेकडो युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते.






