*खासदार डॉ.  नामदेव कीरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मोफत पुस्तकांचे वितरण या सोबतच इतर सामाजिक उपक्रमांचे लोकसभा क्षेत्रात आयोजन*

79

*खासदार डॉ.  नामदेव कीरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मोफत पुस्तकांचे वितरण या सोबतच इतर सामाजिक उपक्रमांचे लोकसभा क्षेत्रात आयोजन*

गडचिरोली ::  गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करिता पुस्तकाचे वितरण करण्यात आले. यासोबतच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात विविध तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण, वृक्षारोपण, रुग्णालययात रुग्णांना फळ व अन्नदान वितरण सारखे विविध उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले.

पुस्तक वितरण कार्यक्रमास गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे 6 हजाराहून अधिक  विद्यार्थी युवक, माननीय खासदार महोदय यांच्यावर प्रेम करणारे स्नेहीजन, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते पदाधिकारी सह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.