जेष्ठ नेते पांडुरंगजी तांगडे यांचे निधन; आज अंत्यसंस्कार

38

जेष्ठ नेते पांडुरंगजी तांगडे यांचे निधन; आज अंत्यसंस्कार

 

सावली तालुक्यातील सहकार महर्षी, जेष्ठ कांग्रेस चे नेते पांडुरंगजी तांगडे यांचे हृदय विकारच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते.

 

सावली तालुक्यातील चक विरखल येथील पांडुरंग पाटील तांगळे हे उत्कृष्ट शेतकरी होते. चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्य होते तसेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते. सिंदेवाही व सावली तालुका निर्माण होणे अगोदर ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. आता ते जयकीसान नागरी सहकारी पतसंस्था चे संचालक होते. अश्या विविध पदावर राहून त्यांनी कार्य केले. त्यांचा एकूलता एक मुलगा नरेंद्र हा कोविड च्या काळात मरण पावला तेव्हा पासून पांडुरंग पाटील हे अस्वस्थ होते. दिनांक 14 ला छातीत दुखू लागल्याने त्यांना नागपूर येथे भरती केले असता त्यांची रात्रीला प्राणज्योत मालावली.

 

आज दिनांक 15 ला सकाळी 11 वाजता चक विरखल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने सावली तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.