आशिष पोरेड्डीवार ने जिंकला ‘सूर संत्रा नगरीचा सीजन 2’ पुरस्कार
नागपूर येथे रजनीगंधा संगीत अकादमीच्या डायरेक्टर परिणीता मातुरकर यांच्यातर्फे सूर संत्रा नगरी सीजन 2 या प्रतियोगीताचे सायंटिफिक सभागृहात आयोजन केले होते. या कार्यक्रमात आशिष सुनील पोरेड्डीवार यास उत्कृष्ट गायक म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
केंद्रीय रस्ते व विकास मंत्री मान. नितीनजी गडकरी आनी मुरारका बिल्डर्सचे शंकर मुरारका यांच्या उपस्थितीत हा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आशिष पोरेड्डीवार यास 11000 रुपयाचे रोख बक्षीस अणि शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला होता. गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आशिषने पारितोषिक पटकविले बदल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आशिष हा गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ता तथा माजी प्राचार्य सुनील पोरेड्डीवार अणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संध्या पोरेड्डीवार यांचा चिरंजीव आहे.





