*चामोर्शी पं.स.चे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री आखाडे साहेब यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी,जिल्हा गडचिरोली च्या वतीने सत्कार.*

129

*चामोर्शी पं.स.चे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री आखाडे साहेब यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी,जिल्हा गडचिरोली च्या वतीने सत्कार.* दिनांक:-१४/०७/२०२५

चामोर्शी :- 👉चामोर्शी पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री आखाडे साहेब यांचा १४ जुलै २०२५ रोजी प़चायत समिती चामोर्शी येथील सभागृहात भेट देऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी,जिल्हा गडचिरोली च्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले.तसेच चामोर्शी पं.स.तील शिक्षकांच्या समस्या जागरुकतेने सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.पंचायत समिती चामोर्शी चे गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्याबद्दल पुढील वाटचाली करिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 👉याप्रसंगी चामोर्शी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा माजी गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री टेंभुर्णे साहेब यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने गटशिक्षणाधिकारी म्हणून आपल्या कार्यकाळात शिक्षकांचे विविध सेवा विषयक प्रश्न विहित मुदतीत निकाली काढण्यात आल्याबद्दल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 👉याप्रसंगी चामोर्शी पंचायत समितीचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री आखाडे साहेब व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी प्राथमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नासंदर्भात आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले. 👉 याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी केंद्रप्रमुख श्री हिंमतराव आभारे सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी केंद्रप्रमुख राजेश कोतावार सर, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी केंद्रप्रमुख श्री जनार्दन म्हशाखेत्री सर,घोट केंद्राचे विद्यमान केंद्रप्रमुख सन्माननीय श्री अनिल मार्तीवार सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अशिमकुमार बिश्वास सर, जिल्हा सल्लागार श्री रोहीदास कुनघाडकर सर जिल्हा सल्लागार टि.टि.सरकार सर,मुरखळा माल‌‌‌ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री राजु मडावी सर,पदवीधर शिक्षक श्री गणेश बोईनवार सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या *महिला संघटिका* श्रीमती निलिमा कोठारे मॅडम,श्रीमती सुनिता लांबाडे मॅडम,श्रीमती लोंढे मॅडम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे चामोर्शी तालुका सरचिटणीस श्री मारोती वनकर सर,कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ सोरते सर, सहसरचिटणीस श्री महादेव डे, प्रसिद्धप्रमुख श्री रुषीदेव कुनघाडकर, तालुका उपाध्यक्ष श्री सुनिल सातपुते सर,शिक्षक संघाचे संघटक श्री गोपाल डे सर, श्री दिगांबर देवकते सर,श्री पुरुषोत्तम किरमे सर,श्री जगदिश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,श्री गोविंद बिडगर सर,श्री रविंद्र आडे, श्री प्रल्हाद चव्हाण सर,श्री बालाजी पवार सर,श्री मिडपिलवार सर, श्री कोयले सर,श्री अनिल मेश्राम सर,श्री दिपक आत्राम सर आदी मान्यवर उपस्थित होते.

👉यावेळी चामोर्शी पं.स.अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या काही प्रलंबित महत्वपूर्ण समस्यांवर चर्चा करण्यात आली.

👉कार्यक्रमाचे संचालन श्री मारोती वनकर सर यांनी केले.तर आभार श्री रुषीदेव कुनघाडकर सर यांनी मानले.