*गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळा सुरू, पण वसतिगृहे बंदच – आमदार रामदास मसराम यांनी आदिवासी विकास मंत्र्यांचे लक्ष वेधले*
*मुंबई–* जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा शैक्षणिकदृष्ट्या सुरू झाल्या असल्या तरीही त्यास संलग्न असलेली विद्यार्थ्यांची वसतिगृहे अद्यापही सुरू न झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
या गंभीर समस्येबाबत *आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. अशोक उईके साहेब* यांना निवेदन देत तातडीने वसतिगृहे सुरू करण्याची मागणी केली.
आमदार मसराम म्हणाले, *“शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही विद्यार्थी वसतिगृहात राहू शकत नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठीण जात आहे. शिक्षणावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने तातडीने निर्णय घेऊन वसतिगृहे सुरू करावीत.”*
त्यांनी यावेळी आश्रमशाळांमधील *अन्नपुरवठा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा* आणि सुरक्षा व्यवस्था याकडेही लक्ष देण्याची मागणी केली.
आमदार मसराम यांनी इशारा दिला की, “जर ही समस्या लवकर सोडवली नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.”





