पवनी तालुका गानली समाजातर्फे अड्याळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
श्री.रंजनजी पाटील पोटवार यांच्या वाड्यात ह्या वर्षी पवनी तालुका गाणली समाजातर्फे समाजातील वर्ग 10 व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा तालुक्यातील समाजबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 10 वी तून 1) गणेशा नितीन वरगंटीवार (91.60%) 2)ओम संदीप वरगंटीवार.(78.%) व 12 वी तून कु.गायत्री पंकज शृंगारपवार (65%)तिन ही रा.अडयाळ यांचा स्मृतिचिन्ह व प्रेरणादायी पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारा ,गोंदिया जिल्हा गाणली समाजाचे अध्यक्ष श्री प्रशांतजी संगीडवार, देवरी.हे लाभलेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा तालुका गाणली समाज अध्यक्ष श्री संजयजी पवार.भंडारा, देवरी तालुका गानली समाज अध्यक्ष उत्तमजी संतोषवार व पवनी तालुका गानली समाज अध्यक्ष हेमंत श्रुगारपवार जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्वश्री मनोजजी मुलकलवार श्री रविंद्र टेपलवार,श्री राकेशजी बल्लमवार , जिल्हा उपाध्यक्ष श्री कुणाल पवार,श्री रंजनजी येनप्रेड्डीवार देवरी श्री रमेश शातलवार हे लाभलेत. विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन श्री सुनीलजी पोटवार,सौ ममताताई मुलकलवार ,सौ. शितल पवार ,श्री नितीनजी वरगंटीवार व श्री यशवंतरावजी वडेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री सुनील पोटवार यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन श्री धनंजयजी मुलकलवार यांनी तर आभारप्रदर्शन श्री गणेशजी आयतुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका उपाध्यक्ष श्री संदीपजी वरगंटीवार , ता.उपाध्यक्षा कु.शुभांगीताई शृंगारपवार, ता.सचिव श्री हर्षलजी पोटवार सदस्या ,सौ. नेहा येनप्रेड्डीवार, इत्यादी समाज बांधवांचे सहकार्य लाभले.*स्व मधुकरराव श्रुंगारपवार स्मृती प्रित्यर्थ हेमंत श्रुंगारपवार* कडून तिन ही विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देण्यात आले व *श्री धनंजयजी मुलकलवार* यांचे कडून तिनही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके देण्यात आली.
नास्ता व चहापाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





