Home Breaking News *आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मॉडेल स्कूल विषयी सभागृहात औचित्याचा मुद्दा...

*आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मॉडेल स्कूल विषयी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडले!*

171

*आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मॉडेल स्कूल विषयी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडले!*

गुरुवारी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी अहेरी पंचायत समिती गाठले

*शुक्रवारी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केले*

 

*मुंबई:_* मॉडेल स्कूल मध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने गुरुवारी अहेरी पंचायतीत पीएम श्री मॉडेल स्कूलचे सर्वच विद्यार्थी शिक्षकांची पूर्तता करावी यासाठी थेट पंचायत समिती गाठले होते .तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची तजवीज केले जाणार असे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी दिले. मॉडेल स्कूल मध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची भरणा व्हावी या महत्वाचे व गंभीर विषयावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे त्यातच मॉडेल स्कूल हे जिल्हा परिषदे अंतर्गत चालविल्या जाते. जिल्हा परिषद शाळेतच शिक्षकांची कमतरता असल्याने आणि प्रतिनियुक्तीवर मॉडेल स्कूल चालविले जात असल्याने सद्य स्थितीत तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता व भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिवेशनात मॉडेल स्कूल विषयी औचित्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले, त्यामुळे मॉडेल स्कूल मध्ये शिक्षकांची भरणा सबंधी व विद्यार्थ्यांचे दर्जेदार गुणवत्ता सबंधी महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्याचे आशा आता पल्लवीत झाले आहे.

Don`t copy text!