Home Breaking News कारगील विजय दिनानिमित्त गडचिरोलीत भर पावसात अभूतपूर्व श्रद्धांजली समारंभ!

कारगील विजय दिनानिमित्त गडचिरोलीत भर पावसात अभूतपूर्व श्रद्धांजली समारंभ!

153

कारगील विजय दिनानिमित्त गडचिरोलीत भर पावसात अभूतपूर्व श्रद्धांजली समारंभ!

 

शहीद जवानांना अमर जवान स्मारकाजवळ राष्ट्रगीत, जयघोष आणि ओल्या अंगांनी नतमस्तक होऊन अभिवादन; देशभक्तीच्या भावना उचंबळून आल्या

 

गडचिरोली, २६ जुलै २०२५ (प्रतिनिधी):

कारगील युद्धात भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना मानवंदना देण्यासाठी आज कारगिल विजय दिन अत्यंत भावनिक, पावसाळी पण प्रेरणादायी वातावरणात गडचिरोली शहरात साजरा करण्यात आला.

या विशेष दिवशी, कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड, कोणसरी,कारगील स्मारक समिती,शासकीय पुंरनियुक्ती माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कारगिल चौक येथे सकाळी ९.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला विविध स्तरांतील नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भर पावसात सुद्धा, राष्ट्रासाठी जिवंत श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिक ओले होत उभे राहिले.

 

कार्यक्रमाची सुरुवात “अमर जवान” स्मारकास पुष्पप्रपुष्पगुच्छ अर्पण करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. वातावरण भारावून गेले होते. संपूर्ण परिसरात “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “शहीद जवान अमर रहें!” अशा घोषणा घुमत होत्या.

 

यावेळी अनेकांनी डोळे पुसले. पावसाच्या थेंबांसारखेच भावनांचे थेंब ही गालांवर ओघळले.

कारगिल दुर्गा उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आपल्या छत्र्यांखाली उभे राहून, अनेकजण ओलेचिंब होऊन शहीदांना नमन करत होते. कोणताही त्रास न मोजता, केवळ देशभक्तीच्या प्रेरणेने ते उपस्थित होते, ही गोष्ट मन हेलावून टाकणारी ठरली.

 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता झाली. यावेळी लॉयड मेटल एनर्जी चे निवासी संचालक निवृत्त कर्नल विक्रम मेहता, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. या वेळीप्रमुख अतिथी माजी खासदार अशोकराव नेते, खासदार नामदेवराव किरसान,म्हणून कारगिल चौक चे अध्यक्ष उदय धकाते,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घिसूलाल काबरा, लॉयड चे हिम्मतसिंह बेडला, लॉयड चे संचालक नटराजन, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, माजी सैनिक जयवंत काटकर, कर्नल एस. के. महापात्रा, कर्नल महेंद्रसिंह, कर्नल रामनाथ स्वामी, मेजर जितेंद्र नागपाल, सुभेदार मेजर पंजननाथन, सुभेदार ऋषीजी वंजारी, कॅ. फगवा ओरन, सुभेदार रामप्रताप शर्मा, यशवंत सिंगारे, महादेव वासेकर, सुभाष नागमोती, मो. सलीम सय्यद, राजू भांडेकर, अरुण बुरांडे, दशरथ गव्हारे, मनोज जावळे, सोमनाथ वैरागडे, दौलत तलमले, सुरेंद्र पाल, दिपक मेश्राम, कैलास कुथे, संजय चौधरी, कैलास सिडाम, वामन ठाकरे, ईश्वर राऊत (नायब तहसीलदार), केशव वड्डे, निलकंठ कुथे, घनश्याम समरित, गुरुदेव सातपुते, धनराज गिरडकर, सुशिल भोयर, खेमचंद सहारे,माजी सैनिक वालदे,आदी माजी सैनिक व मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष कालू गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक सुनिल देशमुख, मोतीराम हजारे, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे,राजू डोंगरे,राजेंद्र साळवे,सुचिता धकाते, निलिमा देशमुख,वनिता भांडेकर, विद्या कुमरे, वनिता धकाते, अंजली भांडेकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

राजीव गांधी प्राथमिक शाळा, गडचिरोली च्या विद्यार्थी यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदू कुमरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन महादेव वासेकर यांनी मानले.

 

हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हे, तर देशप्रेम, शौर्य आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारा प्रसंग ठरला. उपस्थितांनी ‘शहीदों को सलाम’ करत स्मारकासमोर नतमस्तक होत वीरांना कृतज्ञतेची मानवंदना दिली.

 

या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या कार्याची माहिती देण्यात आली. वीर सैनिकांच्या कुटूंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आले.

Don`t copy text!