गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांनाच जिल्ह्यातील शासकीय रस्ते व इतर बांधकाम कामे मिळाले पाहिजे – दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना!…
उद्या आयोजित दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना पदाधिकारी यांचे पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील कॉन्ट्रॅक्टर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे –
दक्षिण गडचिरोली कॉन्ट्रॅक्टर संघटना जिल्हा गडचिरोली
दिनांक 27 जुलै 2025 रोज
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार बांधवांनी मोठ्या मेहनतीने बँकातून करोडो रुपयाचे कर्ज घेऊन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डांबर प्लांट टाकले व मोठा इन्फॉसस्टक्चर तयार करून अनेक वाहने व मोठमोठ्या मशिनरी खरेदी केले व या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार देत आहे, व सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये विविध कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे, व जिल्ह्यामध्ये उत्तम दर्जाचे रस्ते व इतर बांधकामे अविरत सुरू आहेत,परंतु सध्या गडचिरोली जिल्ह्यात एका कंपनीने नुकताच अनुभव नसतानाही रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर बनण्याचा प्रयत्न सुरू केला आहे व गडचिरोली जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर यांचा हातातील कामे स्वतः घेऊन कामे सुरू करण्याचा घाट सुरू केला आहे व या कॉन्ट्रॅक्टर कंपनीने जिल्ह्यातील काही अधिकारी यांना हाताशी घेऊन, नियमांना धाब्यावर बसवून , स्थानिक कॉन्ट्रॅक्टर यांचे कामे हिरावून घेण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केला आहे व जिल्ह्यात उत्कृष्ट कामे करणाऱ्या स्थानिक कन्स्ट्रक्शन कंपनी यांची कामे हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे व सदर प्रयत्न खपवून घेणार नाही व गडचिरोली जिल्ह्यात इतर कोणत्याही कंपनीचे बोगस कामे खपवून घेतले जाणार नाही अशी भूमिका दक्षिण गडचिरोली कॉन्ट्रॅक्टर संघटना यांनी घेतली आहे व वेळ पडेल तर सर्व कंत्राटदार संघटनेच्या वतीने लवकरच रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तयारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेली आहे यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली दंडकारांनी कॉन्ट्रॅक्टर संघटन यांनी पत्रकार परिषद घेण्याची संकल्पना केली आहे त्यानुसार उद्या दिनांक 28 जुलै रोज सोमवारी दुपारी बारा वाजता सदर पत्रकार परिषद सर्किट हाऊस गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने आपली व्यथा पत्रकारांसमोर मांडल्या जाणार आहे व पुढील रणनीती तयार करण्यात येणार आहे तरी गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटन अंतर्गत येणारे सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांनी तसेच या संघटने अंतर्गत येत असलेल्या सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक युवती यांनी या यांनी या पत्रकार संघटनेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून आपली व्यथा मांडावी व पुढील रणनीतीचे आपण सुद्धा भाग बनावे असे आवाहन दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केले आहे ,





