Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी करण्यात आले विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी करण्यात आले विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन

113

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी करण्यात आले विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन

 

* विद्याथ्र्यांना अनुभवायला मिळाली पोलीस दलाची शिस्तबद्धता, तांत्रिक यंत्रणा आणि कार्यपद्धती

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 29/07/2025 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने निवासी अपंग विद्यालय, लांजेडा, निवासी मुक व बधीर विद्यालय, गडचिरोली व कौसल्या निवासी मंतीमंद विद्यालय, बोदली येथील अस्थिव्यंग-मुकबधीर-मतीमंद विद्याथ्र्यांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

समाजातील विविध घटक समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्यांचे जीवनमान सुसह्र होण्यासाठी गडचिरोली पोलीस दल विशेष प्रयत्न करत असते. याचप्रकारे वर नमूद शाळांमधील ‘विशेष काजळीची गरज असणा­या’ बालकांप्रती देखील जबाबदारीची जाणीव दर्शवीत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आजच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष शैक्षणिक सहलीदरम्यान पोलीस मुख्यालय, शस्त्रागार, विशेष अभियान पथक, आयुधिक कर्मशाळा यांना दिलेल्या भेटीदरम्यान विद्याथ्र्यांना पोलीस दलातील शिस्तबद्धतेसोबतच विविध शस्त्रांची माहिती व हाताळणी देखील करण्यास मिळाली. या भेटीच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास विकसीत होण्यास मदत होणार आहे. यावेळी आयोजीत कार्यक्रमादरम्यान शालेय विद्याथ्र्यांना स्कूलबॅग, कंपास, एलसीडी पॅनल बोर्ड, शैक्षणिक तक्ते इ. अत्यावश्यक शैक्षणिक साहित्य तसेच क्रिकेट साहित्य, फुटबॉल, रुबीक्स क्युब, लगोरी इ. खेळाचे साहित्य पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी विद्याथ्र्यांसोबत बोलताना पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, ‘सर्व विद्याथ्र्यांनी स्वत:विषयी आत्मविश्वास बाळगून भविष्याप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. आजच्या युगामध्ये अनेक दिव्यंाग व्यक्तींनी देखील परीस्थितीचा सामना करत कठीण अशा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्याथ्र्यांनी सुद्धा मोठे ध्येय ठेऊन यश मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे.’

सदर कार्यक्रमप्रसंगी पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, श्रीमती लक्ष्मी केतकर, मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय, गडचिरोली, श्री. सुभाष हर्षे, मुख्याध्यापक निवासी अपंग विद्यालय, लांजेडा, श्री. अविनाथ हारगुडे, अधीक्षक निवासी मुक व बधीर विद्यालय, गडचिरोली व श्री. शशिकांत शंकरपुरे मानसशास्त्रज्ञ, कौसल्या निवासी मतीमंद विद्यालय, बोदली हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रापोनि. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे पोउपनि. नरेंद्र पिवाल, पोउपनि. संतोष कोळी तसेच पोलीस मुख्यालय आणि पोलीस कल्याण शाखेचे अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Don`t copy text!